राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा तेजस पाटिल प्रथम! प्रिंट व डिजिटल पत्रकार संघ, समाजभूषण गणपतराव महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम…


उरुळीकांचन : प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ व समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘समाजभूषण’आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी तेजस दिनकर पाटील यांने पटकाविले आहे. त्याला 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस, प्रशस्तीपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले.

वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयाचा विद्यार्थी यश रवींद्र पाटील यांने मिळविला आहे. त्याला 35 हजार रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व चषक देण्यात आले. तर तृतीय क्रमांक पुण्यातील संस्कार मंदिर कला व वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहन ज्योतिराम कवडे याने पटकाविला आहे. कवडेला 25 हजार रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व चषक देऊन सन्मान करण्यात आला. तर या स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद कॉलेजची विद्यार्थिनी अक्षता शिवाजी घरळ व सातारा येथील लाल बहाद्दूर शास्त्री महाविद्यालयाचा विद्यार्थी मिथुन दत्तात्रय माने यांना देण्यात आला. आयोजकांकडून दोघांनाही प्रत्येकी 11 हजार रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व चषक देण्यात आले.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात शनिवारी 1 मार्चला ‘समाजभूषण’आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, स्थानिक सल्लागार शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुभाष काळभोर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. या स्पर्धेला राज्यभरातील 100 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

दरम्यान, या स्पर्धेचा परितोषिक वितरण सोहळा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते शनिवारी (1 मार्च) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पार पडला. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणी काळभोरचे सरपंच भरत काळभोर होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत यशवंत साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष किशोर उंद्रे, राजुकुमार काळभोर, अभिनव चेतना नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष हेमंत हाडके, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राज्यध्यक्ष सुनील जगताप, उपाध्यक्ष प्रशांत चौरे, कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर आदी मान्यवर संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना अभयकुमार साळुंखे म्हणाले की, “तुमच्या मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करणे म्हणजे वकृत्व होय. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वकृत्व खूप महत्वाचे असते. ही गरज ओळखून प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा राबविलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. कारण उद्या भारताचे भवितव्य हे याच तरुणाच्या हातात असणार आहे. त्यामुळे या पत्रकार संघाने राबविलेल्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक करून विशेष आभार मानतो”.

यावेळी एसजीए ग्रुपचे अध्यक्ष शंकर गायकवाड, साधना बँकेच्या संचालिका वंदना काळभोर, यशवंत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर काळे, संचालक संतोष कांचन, सुशांत दरेकर, माजी उपसरपंच देविदास कदम, दिग्विजय काळभोर, युवराज काकडे, ॲड. श्रेयस काळभोर, रूप ज्वेलर्सचे ऋपराज काळभोर, प्राचार्य सीताराम गवळी, प्राचार्या पौर्णिमा शेवाळे, मुख्याध्यापिका संजीवनी बोरकर, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, पत्रकार बंधु, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास मंजुळकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख विजयकुमार घोडके व प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी यांचे बहुमुल्य सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर महेश खुळपे यांनी केले तर आभार प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप बोडके यांनी मानले.

पहिल्यांदा ही स्पर्धा होणार की नाही? याची खात्री मिळत नव्हती. परंतु आम्ही आयोजकांकडे वारंवार विचारणा करीत होतो. तेंव्हा त्यांनी सांगितले की, हे लोणी काळभोर गाव आहे. एकदा निर्णय घेतला की मागे घेतला जात नाही. स्पर्धा ही होणारच? त्या अनुषंगाने ही स्पर्धा उत्तमरित्या पार पडली. या स्पर्धेमधील विषय चांगले होते. महाराष्ट्रातील क्वचितच वक्तृत्व स्पर्धेला एवढी रक्कम दिली जाते. त्यामुळे विचारांना एवढे महत्व दिले जाते. हे मला आज समजले. आयोजकांनी स्पर्धेचे सर्वोत्तम नियोजन केले होते. त्याबद्दल आभार मानतो. व मला पुढील काळात हे बक्षीस नक्कीच प्रेरणा देत राहील.

– तेजस पाटील (प्रथम क्रमांक विजेता)

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!