Teachers : राज्यात शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी अखेर मिळाला मुहूर्त! तब्बल २२ हजार शिक्षकांची पदे भरली जाणार, जाणून घ्या…


Teachers : जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषद शाळांच्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. यामुळे अनेकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. राज्यातील पात्रता धारक उमेदवारांसाठी ही खुशखबर आहे.

यामध्ये पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार राज्यात २१ हजार ६७८ शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. अनेक दिवसांपासून याबाबत मागणी केली जात होती. या सर्व जागांमध्ये राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये यापैकी १२,५२२ पदे भरली जाणार आहेत.

तसेच यामध्ये नगरपरिषदेच्या शाळांमध्ये १,१२३ महानगरपालिकेच्या १८ ठिकाणी शहरांमध्ये २,९५१ शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये खाजगी अनुदानित शाळांनाही लॉटरी लागणार आहे. यामुळे ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. Teachers

या ठिकाणी संस्थाचालकांना तब्बल ५,७२८ शिक्षकांची भरती करता येणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मुलाखती न घेता १७००० जागा भरता येणार आहेत. म्हणजे पुन्हा एकदा तलाठी भरती सारखाच घोटाळा या ठिकाणी होण्याची शक्यता याठिकाणी आहे.

यामध्ये पहिली ते पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दहा हजार २४० शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच अकरावी ते बारावी या उच्च माध्यमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ११५ शिक्षक नववी ते दहावी साठी २१७६ शिक्षक सहावी ते आठवीसाठी ८१२७ शिक्षक भरती होणार आहेत.

यामुळे आता अनेकांनी फिल्डींग देखील लावली आहे. यामध्ये पारदर्शकपणा असावा असेही अनेकांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या भरतीमध्ये घोटाळे समोर आले आहेत. यामुळे सरकारवर टीका केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!