तारक मेहताच्या सोढीची प्रकृती ढासळली, 19 दिवसांपासून अन्नपाणी घेतले नाही, चाहत्यांची काळजी वाढली…

मुंबई : लोकप्रिय असलेली तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील मिस्टर सोढी म्हणजेच अभिनेते गुरूचरण सिंह यांच्या तब्येतीबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती ढासळली असून 19 दिवसांपासून काहीही खाल्लं किंवा प्यालं नाही. त्यांची अवस्था अत्यंत नाजूक झाली आहे.

त्यांची काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याचीही माहिती होती, मात्र ते नंतर घरी परतले. त्यांच्या तब्येतीत सुधारणा न होताच, त्यांनी अन्नपाणी घेणे थांबवले आणि त्यांची अवस्था आणखी गंभीर झाली. गुरूचरण सिंह यांची प्रकृती मागील काही महिन्यांपासून ढासळत चालली होती.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी अभिनेते गुरुचरण सिंह हे बेपत्ता झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी ते घरी परतले, मात्र त्यानंतर काही दिवसात त्यांची प्रकृती प्रचंड ढासळत गेली आहे. त्यानंतर गुरुचरण सिंह यांची मैत्रिण भक्ती सोनी हिने त्यांच्या आरोग्याबाबत देखील त्यांना सांगितले.

दरम्यान, सुरवातीला गुरुचरण सिंह यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयातून परत आल्यावर त्यांनी काम शोधण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र त्यावेळी त्यांना काम मिळाले नाही.
त्यामुळे त्यांनी निवृत्त व्हायचा निर्णय घेतला. तेव्हापासून गुरुचरण सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्या मित्राने सांगितले आहे. त्याचे आई आणि वडील देखील त्याच्या तब्येतीबद्दल खूप काळजीत आहेत. परंतु, तो काहीच ऐकत नसल्याची माहिती समोर आली आहे.