उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी !
उरुळी कांचन : उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. त्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील.
– जर उन्हाळ्यामुळे तुमची त्वचा काळवंडली असेल तर एक मोठा चमचा काकडीचा रस, अर्धा चमचा टोमॅटोचा रस, थोडा लिंबाचा रस, एक छोटा चमचा साय आणि चिमुटभर हळद घेऊन त्याची पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट तुम्ही चेहऱ्याला आणि मानेला लावू शकता. १५ ते २० मिनिटे ही पेस्ट लावून तशीच राहू द्या. त्यानंतर ताज्या थंड पाण्याने ही पेस्ट धुऊन टाका. एक दिवसाआड चेहऱ्याला रोज अशी पेस्ट लावायला हवी.
– एक सफरचंद किसून घ्या. त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला आणि हे मिश्रण चेहऱ्याला आणि मानेला लावा. १५ मिनिटांनी ‘चेहरा कोमट पाण्याने धुऊन टाका. यामुळे त्वचा चमकदार आणि मुलायम होण्यास मदत होईल.
– त्वचेचं या दिवसात पोषण व्हावं म्हणून दही आणि बेसन यांचं मिश्रण एकत्र करून घ्या. त्यासाठी एक चमचा बेसनामध्ये दोन चमचे दही घालून घ्या. हात, पाय, चेहरा आणि मानेला हे मिश्रण तुम्ही लावायला हवं. यामुळे तुमची त्वचा पूर्ववत होईल आणि ती उजळ सुद्धा होईल.
– तेलकट त्वचेसाठी दूध आणि लिंबाचा रस खूप फायदेशीर ठरतो. त्यासाठी कच्च्या दुधात लिंबाचा थोडा रस घाला आणि हे मिश्रण चेहऱ्याला आणि मानेला लावा. ५ ते १० मिनिटे हे मिश्रण राहू द्या. आणि मग पुसून टाका. यामुळे त्वचा साफ होईल शिवाय त्वचेतील अतिरिक्त तेल कमी होईल.