Sushma Andhare : मोठी बातमी! सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, सुषमा अंधारे आतमध्ये बसणारच तेवढ्यात…


Sushma Andhare : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना महाडमध्ये शुक्रवारी घडली आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

महाडमध्ये ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी राज्यभरात सुषमा अंधारे फिरत आहेत. त्यांची काल कोकणात सभा होती. त्यानंतर आज ते बारामतीकडे जाणार होत्या.

त्यासाठी त्यांना घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आले होते. परंतु ते हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सुदैवाने सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळले. परंतु सुषमा अंधारे यांनी आपण सुखरुप असल्याचे म्हटले आहे. या अपघातामध्ये पायलेट सुखरुप आहे.

सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसणार त्याअगोदर हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. सकाळी ९.३० वाजता सुषमा अंधारे बारामतीच्या दिशेने जाणर होत्या. बारामतीत आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाडहून बारामतीला निघाल्या होत्या. बारामतीला जाण्यासाठी त्या हेलिपॅडवर पोहचल्या. Sushma Andhare

हेलिकॉप्टरचा अपघात सुषमा अंधारे यांच्या समोरच झाला आहे. या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. महत्त्वाचे म्हणजे हेलिकॉप्टरचा पायलट सुखरुप आहे. स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले. हेलिकॉप्टरची दृश्य अतिशय भयावह आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!