Supriya Sule : छगन भुजबळ शरद पवार गटात जाणार? सुप्रिया सुळेंचं मोठे विधान, म्हणाल्या…

Supriya Sule : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच जेष्ठ नेते भुजबळ नाराज असल्याने वेगळा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांना स्थान मिळालेले नाही. यामुळे ते नाराज आहेत.
त्यानंतर त्यांनी अजित पवारांवरती थेट टीका केली आणि तरी देखील अजित पवार यांनी त्यांच्या नाराजीबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेले नसल्याची चर्चा होती. त्यानंतर छगन भुजबळ परदेशात गेले होते, आता ते पुन्हा भारतात परतले आहेत. यामुळे ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याबाबत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. छगन भुजबळ यांच्या कुटुंबाशी आमचे अनेक वर्षांपासून कौटुंबीक संबंध आहेत. आमच्यात कधीही अंतर आले नाही .
आम्ही त्यात कधीही राजकारण आणलं नाही आणि येथून पुढेही आणणार नाही, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानंतर छगन भुजबळ वेगळा निर्णय घेऊ शकतात, असे बोलले जात आहे.