Supriya Sule : सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या माझ्या ८० वर्षाच्या बापाला तुम्ही पक्षातून बाहेर काढलं, माझ्या आई वडिलांवर टीका केली तर…


Supriya Sule : पक्ष घेऊन जा, चिन्ह घेऊन जा पवार साहेबांना नोटीस पाठवा. माझ्या ८० वर्षाच्या योध्याला तुम्ही नोटीस पाठवलं, पक्षातून काढून टाकले, सातबाऱ्यावरून वडिलांच नाव काढाल का तुम्ही कधी? पक्षाचा सातबारा कुणाच्या नावावर आहे, शरद पवारांच्या नावावर आहे.

८० वर्षाच्या बापाला तुम्ही घराच्या बाहेर काढलं, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्या अजित पवार व त्यांचा सहकाऱ्यांना सुनावले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या सातबारावर तुमचे नाव आहे. त्यांचे नाही म्हणून ही तुमची लेक लढतीये. सत्य परेशान हो सकता है पराजीत नही, पाठवा पवार साहेबांना नोटीस त्यांची लेक आहे. Supriya Sule

आज माझ्या वडिलांना पक्षातून काढून टाकल जो पक्ष माझ्या वडिलांनी काढला, जो पक्ष तुमच्यामुळे मोठा झाला. मंत्री पदाला हे पुढे आणि कष्ट करायला माझा बाप पुढे. कितीवेळा राज्यात दौरे तुम्ही केले सांगा. जो चोरी केलेला माल आहे तो सोडा, तेवढी दानत दाखवा.

कोणावरही टीका करा पण माझ्या आई वडिलांवर टीका सहन करणार नाही. माझ्यावर टीका करा, रोहितवर, जयंतरावांवर टीका करा, आमच्या सगळ्यांवर टीका करा आम्हाला प्रॉब्लेम नाही पण आई- वडिलांवर टीका सहन करणार नाही.

आमचे वडील काही तुमच्यासारखे मंत्री पदासाठी लाईनीत उभे नव्हते, त्यांनी जे पण केलं ते स्वतःच्या ताकदीवर केले, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!