Supriya Sule : सुप्रिया सुळे सरकारी यंत्रणेच्या रडारवर? पक्षाकडून दावा, नेमकं काय घडलं?
Supriya Sule : महाराष्ट्राच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्य खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाल्याचा मुद्दा आता वाढू लागला आहे. शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने यांनी बुधवारी (ता.१८) आरोप केला की, पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सरकारी यंत्रणांकडून पाळत ठेवली जाऊ शकते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पेगासस स्पायवेअरचा वापर केला जाऊ शकतो, असा आरोप पक्षाने केला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या लोकसभा खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी नुकताच आपला फोन आणि व्हॉट्सॲप अकाउंट हॅक झाल्याचा दावा केला होता. Supriya Sule
याप्रकरणी पुणे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी आरोप केला की सुळे सरकारी यंत्रणांच्या निगराणीखाली असू शकतात.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी अलीकडेच दावा केला आहे की, त्यांचे पती, जे एक व्यावसायिक आहेत त्यांना आयकर विभागाकडून नोटीस मिळाली होती. त्यांनी या कारवाईचा संबंध नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विरोधात संसदेत केलेल्या टीकेशी जोडला.