Supriya Sule : खासदार सुनील तटकरे यांचे तातडीने विलंबन करा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र..

Supriya Sule : राष्ट्रवादी पक्षफुटीचा राज्यात सुरु असलेला वाद आता लोकसभेतही पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे एक पत्र पाठवले आहे. रोहा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे समर्थक सुनील तटकरे यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. Supriya Sule
सुनिल तटकरे हे सध्या अजित पवार गटामध्ये आहेत. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी याचिकांवर सुनावण्या सुरु आहेत. तसेच राज्यात विधानसभा अध्यक्षांकडेही दोन्ही गटांनी आपलाच गट खरा पक्ष असल्याचे दावे करत एकमेकांच्या गटातील आमदारांवर कारवाईची मागणी केलेली आहे. यावरही सुनावणी सुरु आहे. असे असताना दोन-तीन महिन्यांनी सुप्रिया सुळे यांनी खासदार असलेल्या तटकरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी २ जुलै २०२३ रोजी पक्षाची घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांना बडतर्फ करून अपात्र करावे अशी मागणी सुळे यांनी केली होती. तात्काळ कारवाई करून भारतीय राज्यघटनेच्या १० व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेची याचिका सक्षम प्राधिकार्यासमोर दाखल करावी, असा प्रस्ताव सुळे यांनी शरद पवारांकडे मांडला होता. यानंतर आता सुळे या थेट लोकसभा अध्यक्षांकडे गेल्या आहेत.
सुनील तटकरे यांच्या विरोधात पक्षविरोधी कृतीची याचिका करून आता जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटूनही गेला आहे. मात्र, अद्यापही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, अशी खंत सुळे यांनी व्यक्त केली आहे. तसेच यावरील कार्यवाही इतक्या कालावधीपासून प्रलंबित आहे, कार्यवाही केली जात नाही, यामुळे शेड्युल (सूची) दहाचे उल्लंघन होत आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केली आहे.