मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीबाबत दिला महत्त्वाचा निकाल
नवी दिल्ली : बैलगाडा शर्यतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या बैलगाडा शर्यत हा अनेकांचा महत्वाचा विषय बनला आहे. आता बैलगाडा प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
याबाबत बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून तामिळनाडू सरकारने केलेला कायदा वैध ठरवला आहे. तसेच महाराष्ट्र सरकारचा कायदाही वैध असल्याचं म्हटलं आहे. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यामुळे आता बैलगाडा शर्यतीचा रस्ता मोकळा झाला आहे. यामुळे बैलगाडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे आता बैलगाडा शर्यतीसाठी काही अडचण येणार नाही.
महाराष्ट्राबरोबर इतर राज्यात बैलगाडा शर्यत, जलीकट्टू, कंबाला यांना परवानगी देणाऱ्या कायद्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Views:
[jp_post_view]