मानलेला भाऊ झाला वैरी! विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने केला बलात्कार, घटनेने बार्शी हादरली…

बार्शी : भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार बार्शी तालुक्यात घडला आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यामध्ये मानलेल्या बहिणीवरती भावासह तिच्या प्रियकराने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मानलेल्या भावाने व प्रियकराने मिळून 34 वर्षीय विवाहित महिलेला कारमधून कुडूवाडी रस्त्यावरील लॉजवर नेऊन तेथे तिला मारहाण केली.
तसेच त्यानंतर तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावरती सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत दोघांनाही अटक करून बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पिडीत 34 वर्षीय पिडितेने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यामध्ये सुरेश परसु माळी व संतोष भास्कर भानवसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, पीडितेचा नवरा पुण्यामध्ये सेंट्रींग काम करतो, तर पिडित विवाहित महिला तीन महिन्यांपासून आपल्या मुलीसोबत बार्शीमध्ये राहते. यामध्ये सुरेश परसु माळी याच्यासोबत संबंधित पिडितेचे सुमारे सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुरेशचा मित्र संतोष भास्कर भानवसे हा विवाहीतेला बहीण मानत होता.
घटनेच्या रात्री या दोघांनी मिळून पिडितेस चल तुला घरी तुझ्या गावी घेऊन जातो असे म्हणून सुरेश माळी याने त्याच्या स्वीफ्ट गाडीमध्ये बसवून कुर्डूवाडी रोडवरील लॉजवर नेलं. तिथे सुरेश माळी आणि संतोष भानवसे यांनी आळीपाळीने महिलेवर अत्याचार केला. जीवे मारण्याची धमकी दिल्याने ती गप्प राहिली.
तसेच तू गावात राहायचे नाही. तू पुण्यात जाऊन राहायचे. जर पोलिसात तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने करत आहेत. या घटनेने मात्र सगळेच हादरले आहेत. याबाबत तपास सुरु आहे.