सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाने केली मोठी कमाई, चित्रपट नवीन रेकॉर्ड करण्याच्या तयारीत…
मुंबई : अभिनेता सनी देओलच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर खरोखरच धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे, यासोबतच ‘गदर 2’ दररोज कमाईचे नवनवे विक्रम करत आहे.
पहिल्या दिवसापासून हा चित्रपट उत्तम कलेक्शन करत आहे आणि रिलीजच्या 7 दिवसानंतरही हा ट्रेंड थांबलेला नाही. सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर २’ त्याच्या रेकॉर्ड ब्रेकिंग कलेक्शनमुळे आणि प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे बॉलिवूडला काही संस्मरणीय क्षण देत आहे.
‘गदर २’ ने देशभरातील चित्रपटगृहांमध्ये तुफान कमाई केली असून रिलीजच्या अवघ्या 6 दिवसांत 250 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्याच वेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 7 व्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या कमाईचे प्रारंभिक आकडे देखील आले आहेत.
‘गदर 2’ ने सातव्या दिवशी 23.28 कोटींची कमाई केली आहे. ‘गदर २’ चित्रपटाची एकूण कमाई आता 284.63 कोटींवर गेली आहे. ‘गदर 2’ 300 कोटींचा टप्पा पार करण्यापासून थोडाच दूर आहे. ‘गदर २’बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे.
या वीकेंडला चित्रपट हा आकडा पार करेल आणि त्याच्या कलेक्शनमध्ये आणखी काही कोटींची भर पडेल अशी अपेक्षा आहे. ‘गदर 2’ 2023 मध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. ‘गदर २’ आधीच ‘पठाण’ नंतर वर्ष 2023 मधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे.
बॉलिवूड हंगामा नुसार, शाहरुख खानच्या ‘पठाण’ने भारतात 543.05 कोटींची कमाई केली आहे. त्याच वेळी, ‘गदर २’ ने बॉक्स ऑफिस हिट ‘द केरळ स्टोरी’ च्या आजीवन कलेक्शनलाही मागे सोडले, ज्याने 242.20 कोटी रुपयांची कमाई केली.