Sunny Deol New Project : ‘गदर २’ च्या यशानंतर सनी देओलच्या ‘लाहोर- १९४७’ चित्रपटाची घोषणा, ‘हा’ मोठा अभिनेता करणार निर्मिती..
Sunny Deol New Project मुंबई : सनीच्या गदर २ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असताना पुन्हा एकदा बॉलीवूडच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आमिर खान प्रॉडक्शन्स या आमिर खानच्या कंपनीने लाहोर-१९४७ या चित्रपटाची घोषणा केली आहे. Sunny Deol New Project
लाहोर-१९४७ या चित्रपटात सनी देओल हा प्रमुख भूमिका साकारणार असून आमिर खान प्रॉडक्शन्स ही आमिरची प्रॉडक्शन कंपनी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. आमिर खान प्रॉडक्शन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करुन लाहोर-१९४७ या चित्रपटाची माहिती देण्यात आली आहे.
आमिर खान प्रॉडक्शन्सच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, ‘AKP ची संपूर्ण टीम सनी देओल अभिनीत आणि राज कुमार संतोषी दिग्दर्शित लाहोर-१९४७ या चित्रपटाची घोषणा करताना खूप आनंदी आहे.
आम्ही अत्यंत टॅलेंटेड सनीसोबत आणि आवडते दिग्दर्शक राज कुमार संतोषी यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. आम्ही जो प्रवास सुरू केला आहे तो समृद्ध होण्याची अशा आम्ही बाळगतो. आम्हाला तुमचे आशीर्वाद हवे आहेत.’ आता आमिर, सनी देओल आणि राज कुमार संतोषी यांच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
दरम्यान, आमिर खान प्रॉडक्शन्सच्या या पोस्टवर एका यूझर्सने कमेंट केली आहे की, व्वा! माझे दोन आवडते अभिनेते एकत्र येत आहेत. तर दुसऱ्या युझरने म्हटलेय, गदर २ प्रमाणेच हा चित्रपट देखील ब्लॉकबस्टर होईल.