पिंपरी चिंचवड हादरलं!! एकाच दिवशी ७ जणांची आत्महत्या, नेमकं असं काय घडलं?

पुणे : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहरात विविध ठिकाणी एकाच दिवशी टोकाचं पाऊल उचलत सात जणांनी आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनांवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी की, पुण्यातील पिंपरी-चिंचवड या भागात एकाच दिवसात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये कमालीची चिंता व्यक्त केली जात. याबाबत पोलीस तपास करत आहेत. प्रत्येक घटनेचे वेगळे कारण सांगितले जात आहे.
यामध्ये एकाने इमारतीवरून उडी घेत टोकाचे पाऊल उचलले आहे. रावेत, हिंजवडी, वाकड, सांगवी आणि चिखली या भागातील या धक्कादायक घटना घडल्या आहेत. यामुळे आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यामध्ये चाकण भागात गौरव अगम या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रावेत भागात राहणाऱ्या प्रसाद संजय अवचट या तरुणाने दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. भोसरी भागातील तिसर्या घटनेत विकास मुरगुंड या व्यक्तीने गळफास घेतला.
तसेच हिंजवडी परिसरातील मनाप्पा चव्हाण या व्यक्तीने आत्महत्या केली. तसेच वाकड भागातील नवनाथ भगवान पवार यांनी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. या सगळ्यांची वेगळी कारण असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच सांगवी येथील सुवर्णा पवार या महिलेने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. तर चिखली मधील इमारतीवरून उडी मारून दिनेश लोखंडे या व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.