अखेर ती माहिती येणार बाहेर! कुरुलकरांच्या व्हॉटसअॅपचा बॅकअप मिळविण्यात यश, पाकिस्तानला माहिती दिल्याचा आरोप
मुंबई : पाकिस्तानी गुप्तचरांच्या हेरांच्या हनीट्रॅपमध्ये अडकून गुप्त माहिती दिल्याप्रकरणी सध्या डॉ. प्रदीप कुरुलकर अटकेत आहेत. यांच्याबाबतची आणखी महत्वाची माहिती समोर आली आहे.
कुरुलकर यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. कुरुलकर यांचा एक मोबाइल डिकोड करता आला नाही. त्यामुळे एटीएसने तो मोबाइल ताब्यात घेऊन कुरुलकर यांच्याकडून पासवर्ड घेऊन अनलॉक केला होता. त्या मोबाइलमध्ये कुरुलकर यांचे सीमकार्ड होते. या मोबाइलमधील व्हॉट्सअॅप डिलीट केल्याचे दिसून आले.
त्यानंतर एटीएसने पुन्हा ते डाउनलोड करून त्यांच्या नंबरवर व्हॉट्सअॅप सुरू केले आणि त्याचा बॅकअप घेतला. यामुळे आता महत्वाची माहिती समोर येणार आहे.
दरम्यान, पाकिस्तानला माहिती पुरविल्याच्या आरोप संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर आहे. त्यांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. आता चौकशी सुरू आहे.