विद्यार्थिनीचं शाळेसमोरून अपहरण, मामाच्या घरी सोडतो म्हणत नराधमाने जंगलात नेलं अन्…


भंडारा : भंडाऱ्यातील तुमसर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळकरी मुलीचं अपहरण करून तिच्यावर जंगलात अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

तसेच आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुभम उईके असं अटक केलेल्या २१ वर्षीय आरोपीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शनिवारी नेहमी प्रमाणे शाळेत गेली होती. शाळा सुटल्यानंतर ती शाळेच्या गेटसमोर उभी असताना एक तरुण दुचाकीने त्याठिकाणी आला. तुला मामाच्या घरी सोडतो, अशी बतावणी करत आरोपीनं पीडितेचे अपहरण केले आहे.

यानंतर आरोपी पीडितेला घेऊन एका जंगलात गेला. याठिकाणी आरोपीनं तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र एका अंगणवाडी सेविकेमुळे मोठा अनर्थ टळला. अंगणवाडी सेविकेनं दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी नराधमाच्या तावडीतून पीडितेची सुटका केली.

शनिवारी दुपारी १२ वाजता तो पीडित मुलीच्या शाळेबाहेर दुचाकी घेऊन उभा होता. शाळा सुटल्यानंतर पीडित विद्यार्थिनी आपल्या घरी जात होती. यावेळी नराधम आरोपी त्याठिकाणी आला. तुला मामाच्या घरी सोडतो, असं सांगत त्याने पीडितेला दुचाकीवर बसवलं. हा प्रकार एका अंगणवाडी सेविकेनं पाहिला.

त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी पीडितेच्या मामाच्या घरी जाऊन याची माहिती दिली. अनोळखी तरुणाने भाचीला नेल्याचं समजताच मामाने क्षणाचाही विलंब न करता काही लोकांना सोबत घेत जंगल परिसर गाठला. जंगलात शोधाशोध केली असता, पीडितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करताना शुभम आढळला.

दरम्यान, यानंतर गावकऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलं.पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो कलमांसह गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!