टक्कल केला अन् पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या, शेवटच्या चिठ्ठीत सगळंच सांगितलं…


पुणे : पुण्यातील बी जे मेडिकल महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हॉस्टेलमधील समोरच्या रुममध्ये गळफास घेत तिने आयुष्य संपवले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने टक्कल केला होता.

तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमधून तिच्या आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झाला आहे. आई-वडिलांची माफी मागणारा मजकूर तिने शेवटच्या चिठ्ठीत लिहिला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. ही विद्यार्थिनी दुसऱ्या वर्षाला शिकत होती. तिच्या रुमच्या समोर असलेल्या एका खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

यावेळी तिची सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. त्यानुसार पोलीस तपास सुरू आहे. तिच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर तिचा भाऊ राजस्थान येथून पुणे शहरात दाखल झाला आहे. तिच्यावर मानसोपचार तज्ञांची ट्रीटमेंट सुरु होती, अशी माहिती मिळत आहे. तिच्यावर औषध-गोळ्या देखील सुरु होत्या.

विद्यार्थिनी आठवीत असल्यापासूनच मानसिक रुग्ण होती. अशी देखील माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने टक्कलही केल्याची माहिती समोर आली आहे. मला शिकायचे आहे, पण माझ्याकडून होत नाही, मला माफ करा, असा आई-वडिलांना उद्देशून मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी याठिकाणी दाखल होत बॉडी ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही केली. या घटनेने मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने सगळेच हादरले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!