देशात परतीच्या मान्सूनची दमदार हजेरी ! महाराष्ट्रसह दोन राज्यात पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस …!


 

नवी दिल्ली: देशात परतीच्या मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने पाणी संकट व शेतीच्या पाण्यासाठी सुरू झालेल्या तीव्र समस्येला दिलासा मिळाला आहे. देशभरात मान्सून ने पाठ फिरवली असताना शुक्रवारी सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. येत्या तीन दिवसांत पश्चिम मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

शुक्रवारी उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशाच्या पूर्व भागात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो. गुरुवारी उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत पाऊस झाला. शुक्रवारी १९ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस म्हणजे ९ आणि १० सप्टेंबर रोजी १४ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

मुंबईत पावसाचा येलो अलर्ट

भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये ८ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!