देशातील १८ राज्यात वादळ वारा पावसाचा इशारा, चक्रीवादळाचाही फटका बसण्याची शक्यता, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज…


नवी दिल्ली : देशभरातील १८ राज्यांमध्ये वादळ, वारा आणि मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागाने इशारा दिला आहे. इराक आणि बांगलादेशातून येणाऱ्या चक्रीवादळांचा प्रभाव भारतातील अनेक भागांवर पडणार आहे.

विशेषतः जम्मू-काश्मीर, बिहार, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात याचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, १६ मार्चपर्यंत देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा आहे.

पहिले चक्रीवादळ इराकमधून उत्तर भारतात प्रवेश करत असून, यामुळे दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या भागांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. दुसरे चक्रीवादळ बांगलादेशातून येणार असून, पूर्व आणि ईशान्य भारतातील हवामानात मोठा बदल घडवून आणण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १६ मार्चपर्यंत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार हिमवृष्टी आणि वादळी पावसाचा इशारा आहे.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक भागांत पूरस्थिती, वीजपुरवठा खंडित होणे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पूर्व किनारपट्टीवरील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे, कारण वाऱ्याचा वेग ताशी ६० किमीपर्यंत जाऊ शकतो. हवामान विभागाच्या माहितीनुसार, १६ मार्चनंतर चक्रीवादळाच्या तीव्रतेत घट होण्याची शक्यता आहे, मात्र काही भागांत पावसाचा मारा सुरूच राहू शकतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!