डिझेल संपले म्हणून थांबले अन् काळाने झडप घातली!! दुसऱ्या गाडीने अशी धडक दिली की चार पोर जागीच गेली, घडलं भयानक….


स्कॉर्पिओ गाडीतील डिझेल संपल्याने गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सहा जण थांबले होते. मात्र यावेळी एक धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. गोवा महामार्गावर वीर रेल्वे स्टेशन जवळ मागून टोइंग व्हॅन वेगात आल्याने स्कॉर्पिओलासह जवळ उभी असलेल्या सर्वांनाच जोरदार धडक दिली.

यामुळे मोठी खळबळ उडाली. या घटनेत महाड येथील सूर्यकांत मोरे, साहिल शेलार, समिप मिंडे व प्रसाद नातेकर हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले, तर सुरेश नलावडे व शुभम माटल हे दोघेजण जखमी झाले. यामुळे हा अपघात किती भीषण असेल याचा अंदाज आपल्याला येईल. अपघातानंतर स्कॉर्पिओ गाडीचा चक्काचूर झाला.

याबाबत पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळी रात्र असल्याने याबाबत अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे दिसून येत आहे. ही गाडी देखील तब्बल दीडशे फूट लांब फेकली गेली. हे सहा जण वीर रेल्वे स्थानकाजवळ त्यांच्या स्कॉर्पिओ जीप मधील डिझेल संपल्याने गाडी उभी करून थांबले होते.

डिझेल आणण्यासाठी एक जण गेला होता. तोपर्यंत ही घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली. यावेळी उशिरा माहिती मिळाल्याने मदत देखील उशिरा मिळाली असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत तपास सुरू आहे.

या अपघातात गाडीचे देखील पूर्णपणे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी हा अपघात झाल्याने याचा अंदाज देखील कोणाला आला नाही. यामुळे याबाबत चौकशी करण्यात अडथळे येत आहेत. पोलीस मात्र तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!