राज्य सरकारचा लाडक्या बहिणींना दणका ; आता’ या ‘बहिणींना मिळणार नाहीत 1500 रुपये


पुणे : महायुती सरकार सत्तेत आणण्यात मोलाचा वाटा ठरलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला यंदा एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र आता या योजनेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेत लाडक्या बहिणींना धक्का दिला आहे.राज्य सरकारने आता ८० हजाराहून अधिक लाडक्या बहि‍णींचे अर्ज रद्द केले आहेत. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना मोठा फटका बसला आहे.

राज्य सरकारने गेल्यावर्षी १८ जून २०२४ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत राज्य सरकार राज्यातील पात्र महिलांना आधार देण्यासाठी मासिक आर्थिक मदत देईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये ही रक्कम जमा होते. मात्र आता एकापाठोपाठ एक राज्यातील लाडक्या बहि‍णींना धक्के बसत आहेत.. सरकारने 80 हजाराहून अधिक लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द केल्याने 1500 रुपये आता या बहिणींना मिळणार नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली आहे.

जालना आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांतील लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का बसला आहे. आयकर विभागाच्या छाननीनंतर विविध कारणांमुळे हजारो अर्ज अपात्र ठरले आहेत. ज्यामुळे अनेक महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!