हॉटेल चालकाने जेवणावर मोफत ‘सूप’ ची ऑफर दिल्याने, दुसऱ्या हॉटेल चालकाने केला कोयत्याने वार…!


खडकी: आपल्याकडील ग्राहक वाढविण्यासाठी एका हॉटेल चालकाने जेवणावर ‘मोफत सूप’ देण्याची योजना सुरू केली. त्यामुळे त्याचे ग्राहक वाढल्याचा राग मनात धरून दुसऱ्या हॉटेल चालकाने त्याच्या डोक्यात कोयत्याने मारहाण केल्याचा प्रकार खडकीत समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ,याप्रकरणी मुलायम रामकृपाल पाल यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सिद्धार्थ भालेराव आणि दिग्विजय गजरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी पाल यांचे ‘ओ शेठ’, तर आरोपींचे ‘साहेब’ नावाचे हॉटेल आहे. फिर्यादी यांनी त्यांचे ग्राहक वाढावे, यासाठी जेवणाआधी ‘मोफत सूप’ देण्याची योजना चालू केली, त्यामुळे फिर्यादींचे ग्राहक वाढले, त्याचा राग मनात धरून आरोपी चौपाटी येथे आले. त्यांनी फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!