SSC 10th Result 2024 : यंदाही मुलींनीच मारली बाजी! राज्यात दहावीचा निकाल ९५.८१ टक्के, कोकण विभाग सर्वात पुढे…
SSC 10th Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून विद्यार्थी हे दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. शेवटी आज दहावीचा निकाल लागला आहे.
दहावीचा यंदाचा एकूण निकाल ९५.८१ टक्के इतका लागला आहे. यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून नागपूर विभाग मात्र तळाशी आहे. नागपूर विभाग ९४.७३ टक्क्यांसह राज्यातील विभागनिहाय टक्केवारीनुसार सर्वात खाली आहे. तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. SSC 10th Result 2024
निकाल जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेतून निकालासंदर्भातील ठळक माहिती देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३ -२०२४ मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख ९ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचीही निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना एक वाजल्यापासून निकाल पाहता येतील, तसेच, निकालाची प्रत विद्यार्थी डाऊनलोडही करू शकणार आहेत.
विभागनिहाय निकाल…
पुणे – 96.44 नागपुर- 94.73 संभाजीनगर – 95.19 मुंबई – 95.83 कोल्हापूर – 97.45 अमरावती – 95.58 नाशिक – 95.28 लातूर – 95.27 कोकण – 99.01
दहावीचा निकाल कुठे पाहाल?
https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org