Special Session of Parliament : संसदेचे विशेष अधिवेशन कशासाठी.? महत्वाची माहिती आली समोर, जाणून घ्या ‘त्या’ ४ बिलांचा अजेंडा…

Special Session of Parliament नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने संसदेच विशेष अधिवेशन का बोलावल? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर या अधिवेशनचा अजेंडा समोर आला आहे. संसदेच विशेष अधिवेशन बोलवण्यात आलय, त्यावरुन बरेच अंदाज वर्तवले जात होते. (Special Session of Parliament)
बुधवारी प्रसिद्ध झालेल्या लोकसभा आणि राज्यसभेच्या बुलेटिननुसार, संविधान सभेपासून सुरू झालेल्या ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासावर संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चर्चा होणार आहे. तसेच या विशेष अधिवेशनात चार महत्वाचे विधेयक सरकारच्या वतीने मांडण्यात येऊ शकतात.
यामध्ये अधिवक्ता (सुधारणा) विधेयक २०२३ आणि प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक २०२३ यांचा समावेश आहे, जे लोकसभेत सादर केले जातील. हे विधेयक ३ ऑगस्ट रोजी राज्यसभेत मंजूर करण्यात आले.
दरम्यान, याशिवाय पोस्ट ऑफिस विधेयक २०२३, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवेच्या अटी आणि पदाचा कालावधी) विधेयक २०२३ वर राज्यसभेत चर्चा केली जाईल. ही दोन्ही विधेयके १० ऑगस्ट रोजी राज्यसभेत मांडण्यात आली होती.