मुलांनीच लावून दिले विधवा आईचे लग्न…!
चेन्नई : भास्कर आणि त्याची आई ‘सेल्वी’ हे तामिळनाडूतील कल्लाकुरिची येथील प्रांगमपट्टू पंचायतीचे रहिवासी आहेत. भास्कर आणि त्याचा धाकटा भाऊ विवेक या दोघांनी लहान असतानाच आपले वडील गमावले. २००९ मध्ये जेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा भास्कर वेल्लोरमध्ये अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात होता तर लहान भाऊ विवेक अकरावीत शिकत होता.
याबद्दल बोलताना, भास्करच्या आईने सांगितल कि, ‘‘माझ्या वयाच्या मुलांनी मला पुन्हा लग्न करण्यास सांगितले तेव्हा मला धक्काच बसला. तसेच, मला अभिमान वाटलं की या समाजात माझ्या मुलांसारखी मानसिकता इतर कोणाची नाही. इथे अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी आपले पती गमावले आहेत, आणि एकट्या आपल्या मुलांचे संगोपन करत आहेत.
भास्करने सांगितले की, त्यावेळी आम्ही आईच्या दुस-या लग्नाचा विचार केला नव्हता. मी अनेक महिलांना त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर एकट्याने मुलांचे संगोपन करताना पाहिले होते. ‘आईलाही सोबती हवा’ त्यामुळे हा विचार केला.