सोनिया गांधींच्या प्रकृतीमध्ये बिघाड; रुग्णलयात दाखल…!


नवी दिल्ली :  काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे . त्यांना गुरुवारी ताप व छातीतील संसर्गामुळे तातडीने दिल्ली स्थित सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.

 

दरम्यान , सर गंगाराम रुग्णालय ट्रस्ट सोसायटीचे चेअरमन डॉक्टर डी. एस. राणा यांनी सांगितले की, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांना २ मार्च रोजी चेस्ट मेडिसिन विभागाचे सीनिअर कंसलटंट डॉक्टर अरुप बसू यांच्या निगराणीखाली सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तपासणी सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 

 

सोनिया गांधी यांना गत जानेवारी महिन्यातही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाले होते. जवळपास आठवडाभर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली होती. त्यावेळी भारत जोडो यात्रेत व्यस्त असणारे राहुल गांधीही पदयात्रा सोडून दिल्लीला पोहोचले होते. 

 

 

 

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!