सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीचा कारणामा! पत्नीकडे 15 लाखाची मागणी अन् बॉससोबत शरीरसबंध, पतीच्या कृत्याने सगळे हादरले…

कल्याण : सोहेल शेख या सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या पत्नीसोबत एक धक्कादायक प्रकार केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये राहाणाऱ्या एका तरुणी बरोबर त्याचा विवाह झाला होता. हा त्याचा दुसरा विवाह होता. त्यानंतर तो दुसऱ्या पत्नी बरोबर कल्याणमध्ये राहत होता.

लग्नाला दोन तीन महिने झाल्यानंतर सोहेल पत्नीला त्रास देवू लागला. त्याने पत्नीकडे पंधरा लाखाची मागणी केली. माहेरून पंधरा लाख घेवून ये, असा आग्रह धरला. पहिल्या बायकोला त्याला घटस्फोट द्यायचा होता. त्यासाठी तिला पंधरा लाख द्यायचे आहेत. असं खोटं सांगून तो तिला मानसिक त्रास देत होता.
तिला पैसे दिल्यानंतर माझी सुटका होईल असं तो त्याच्या दुसऱ्या बायकोला सांगत होता. त्यासाठी तो पंधरा लाखाची मागणी करत होता. एक दिवस त्याने त्याच्या ऑफिस पार्टीत तू चल असा आग्रह पत्नीला केला. पत्नीची इच्छा नसताना ती त्याच्याबर गेली.

या पार्टीत तू माझ्या बॉस बरोबर शरिर संबध ठेव असा धक्कादायक आग्रह त्याने पत्नीकडे केला. त्याने तिला मारहाणही केली. पत्नीने मात्र सर्व गोष्टींना नकार दिला. त्याने पत्नीला तिथेच तिन तलाक देवून टाकला. या घटनेनं पत्नी हादरून गेली. तिला घराबाहेर देखील काढण्यात आले. याबतर तिने घडलेला सगळा प्रकार इतरांना सांगितला. यामुळे ही घटना उघडकीस आली.
तिने लगेच पोलिसात धाव घेतली. नंतर पत्नीला तलाक देणाऱ्या सोहेल शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. घटनेने कल्याणमध्ये घडल्याने सर्वच जण हादरून गेले आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.