धक्कादायक! कोरेगाव भीमा येथील सहावीतील विद्यार्थीनी गरोदर, घटनेने पुण्यात खळबळ..


पुणे : कोरेगाव भीमा येथे सहावीत शिकणारी 14 वर्षे वयाची विद्यार्थिनी गरदोर असल्याचा खळबजनक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थिनीच्या पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी गावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

असे असताना मात्र डॉक्टरांनी पोटात दुखण्याचे कारण सांगितल्याने विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना हादरा बसला. पीडित विद्यार्थीनी अत्याचाराने गरोदर राहिल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

त्यांच्या घराशेजारील राहणाऱ्या युवकाने अत्याचार केले. दुकानातून घरी येताना तिला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्यानंतर कोणाला काय सांगितले तर तुला जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली असल्याने विद्यार्थिनीने आईला सांगितले.

 

दरम्यान विद्यार्थिनीवर उपचार सुरू करण्यात आले आणि उपचार सुरू असताना विद्यार्थिनीच्या आईसह अन्य नातेवाईकने तिला विश्वासात घेत विचारपूस केली. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!