नायगाव येथून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता; बेपत्ता होऊन सहा दिवसांनी गुन्हा दाखल; पोलिसांच्या तपासात गांभिर्याबाबत प्रश्नचिन्ह…


उरुळी कांचन : नायगाव फाटा (ता. हवेली ) येथील श्रेयस नर्सरीत वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.

आईने रागावल्याने तसेच एका दुकाणात चोरीच्या उद्देशाने दुकानदाराने बेदम मारहाण झाल्याचा घटना मुलाबाबत घडून मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या बेपत्ता प्रकरणात मुलगा तब्बल सहा दिवसांपूर्वी बेपत्ता होऊन गुन्हा सहा दिवसांनी दाखल झाल्याने पोलिसांची निष्कियता की आणखी काही म्हणून या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

पियुष संदीप शिंदे (वय 16 वर्षे 10 महिने) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील संदीप शामराव शिंदे (वय 41, व्यवसाय- मजुरी, रा. श्रेयस रोज नर्सरी, नायगाव फाटा, ता. हवेली, जि. पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संदीप शिंदे हे श्रेयस रोझ नर्सरीत वास्तव्यास आहे. मोलमजुरी करुन ते आपला
उदर्निवाह करतात. गुरुवारी (दि. २१) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संदीप शिंदे आणि त्यांची पत्नी हे दोघे नेहमीप्रमाणे नर्सरीमध्ये काम करत होते. त्याच वेळी त्यांचा मुलगा पियुष शिंदे हा घरात होता. घरात पियुषचे त्याच्या लहान भावासोबत किरकोळ भांडण झाले होते. त्यामुळे त्याची आई त्याला म्हणाली की, “घरात लहान भावासोबत भांडण करू नको.

“आईच्या या बोलण्याचा राग आल्याने किंवा इतर काही कारणाने पियुष हा घरात कोणालाही काहीही न सांगता अचानक कोठेतरी निघून गेला. दुपार झाली तरी मुलगा घरी न आल्याने पालकांनी त्याची सर्वत्र शोधमोहीम सुरू केली. नातेवाईक, मित्रपरिवार आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही पियुषचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर बुधवारी (दि.२८) रोजी त्याचे वडील संदिप शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान मुलगा बेपत्ता घटनेला सहा दिवस उलटून गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्य दाखविले काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात बेपत्ता वडीलांच्या तक्रारीला तक्रारीला गांभीर्याने घेऊन प्रकरणाचा तपास झाला काय म्हणून शंका उपस्थित होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!