उन्हाळ्यात चेहऱ्यावर बर्फ लावताय? मग थांबा! जाणून घ्या गंभीर दुष्परिणाम…

Summer Skincare : चेहऱ्यावर मुरुम, काळे डाग घालवण्यासाठी तसेच ग्लोइंग स्कीन मिळवण्यासाठी बहुतांश लोक अथक प्रयत्न करतात, पण खूप प्रयत्न करूनही अनेकदा कोणताही फरक दिसून येत नाही. अनेक लोक चेहऱ्यावर बर्फ लावतात.
बर्फामुळे त्वचा थंड होते, रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा चमकदार दिसते. मात्र, याचा जास्त वापर त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो. बर्फाच्या योग्य वापराविषयी आणि त्याचे फायदे-तोटे आज जाणून घेऊया..
बर्फ लावण्याचे फायदे पुढील प्रमाणे..
सूज आणि डार्क सर्कल्स कमी होतात- डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी बर्फ प्रभावी ठरतो.
त्वचा हायड्रेटेड ठेवते – उन्हामुळे त्वचा कोरडी पडते, बर्फामुळे ओलावा टिकून राहतो.
त्वचेचा पोत सुधारतो – बर्फाच्या वापरामुळे त्वचेचे पोर्स घट्ट होतात आणि चेहऱ्याचा पोत सुधारतो.
त्वचेला ताजेतवाने ठेवते – बर्फामुळे त्वचेतील रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे त्वचा चमकदार आणि फ्रेश दिसते.
बर्फ लावण्याचे तोटे पुढील प्रमाणे..
पेशींचे नुकसान होऊ शकते -जास्त वेळ बर्फ लावल्यास त्वचेच्या पेशींना धोका निर्माण होतो आणि सुरकुत्या वाढण्याची शक्यता असते.
त्वचेची संवेदनशीलता वाढते – काही लोकांना बर्फामुळे अॅलर्जी होऊ शकते, त्यामुळे त्याचा मर्यादित वापर आवश्यक आहे.
अति थंडपणामुळे नुकसान -संवेदनशील त्वचेसाठी बर्फ धोकादायक ठरू शकतो, कारण त्वचेला लालसरपणा आणि सूज येऊ शकते.
त्वचेचा ओलावा कमी होतो – बर्फाचा अतिवापर केल्याने त्वचा कोरडी पडते आणि नैसर्गिक ओलावा कमी होतो.
योग्य प्रकारे बर्फ कसा वापरावा?
थेट त्वचेवर न लावता कपड्यात गुंडाळून लावा. एकावेळी १-२ मिनिटांपेक्षा जास्त वेळ बर्फ लावू नका. सर्वसाधारण त्वचेसाठी दिवसातून १ वेळेसच वापरा. संवेदनशील त्वचा असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.