धक्कादायक! मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबलची सायबर फसवणुकीतून तब्बल 90 हजाराची लूट..


मुंबई : मुंबईतील पोलिस कॉन्स्टेबल यांची सायबर फसवणुकीतून जवळपास ९० हजार रुपयांची लूट केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.पोलिसांनाच फसवलं जात असल्याने सामान्य जनता किती सुरक्षित आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल सचिन चव्हाण (वर्षे ५२) यांना ९ सप्टेंबर रोजी अज्ञात क्रमांकावरून फोन आला. चव्हाण यांनी फोन उचलला असता त्यांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खात्यावर चुकून ३० हजार रुपये पाठवल्याचे सांगितले. मात्र चव्हाण यांच्या खात्यावर पैसे आलेच नव्हते तरीही अज्ञात व्यक्तीने त्यांना पैसे परत करण्याची विनंती केली. चव्हाण यांनी सुरुवातीला पाच हजार रुपये पाठवले त्यानंतर त्या व्यक्तीने लिंक पाठवून कोड टाकण्यास सांगितले. काही वेळाने चव्हाण यांच्या खात्यातून सुरुवातीला 77,091 आणि नंतर 12012 रुपये वजा झाले. त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी तात्काळ हेल्पलाइनवर संपर्क साधला आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 319 (2)आणि माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेनंतर सायबर लुटारू पोलीस खात्याला सहज लुबाडत असतील तर सामान्य जनता कुठे सुरक्षित असणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!