प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार चालकाचा धक्कादायक वैद्यकीय अहवाल समोर , ड्रायव्हरचे मद्यसेवन? पोलिस कारवाई करणार…


पुणे : लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारने 30 सप्टेंबर रोजी एका रिक्षाला जोरदार धडक दिली. अपघात प्रकरण तापल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. आता याप्रकरणी कार चालकाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर प्राथमिक अहवाल सादर केला. त्यात संतोष उभे याने मद्यसेवन केलं नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अपघात कसा झाला असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वैद्यकीय अहवालात काय?

संतोष दिनकर उभे असं गौतमी पाटील हिच्या कारच्या चालकाचं नाव आहे. ससून रुग्णालयाने त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर प्राथमिक अहवाल सादर केला. त्यात संतोष उभे याने मद्यसेवन केलं नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मग आता हा अपघात नेमका घडला कसा? यात चूक तरी कुणाची असे सवाल समोर येत आहे. हा अपघात झाल्यानंतर क्रेन आणणे आणि कार नेणे या प्रकारामुळे संशय वाढला चालला आहे.

       

अपघाताचा प्रकरणाने वातावरण तापल्यानंतर पोलीस तपासाला आणखीन वेग आला. या प्रकरणी त्यांनी गौतमीचा कारचालक संतोष उभे याचे ससून रुग्णालयाने वैद्यकीय नमुने घेतले आणित्याविषयीचा अहवाल आता समोर आला आहे. त्यानुसार, चालकाच्या श्वासामध्ये मद्याचा कोणताही वास येत नव्हता. चालकाच्या डोळ्याच्या बाहुल्या सुद्धा बदलल्या नाहीत. त्या नेहमीप्रमाणेच होत्या. ड्रायव्हरचे बोलणे स्थिर होते. डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे सदर व्यक्तीने मद्याचे सेवन केले नव्हते. विश्लेषणात्मक तपासणीसाठी ड्रायव्हरचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.

दरम्यान या अपघातानंतर सिंहगड रोड पोलिसांनी गौतमी पाटील हिला बाजू मांडण्यासाठी बोलावले होते. मात्र गेल्या 4 दिवसांपासून गौतमी पाटील हिने पोलिसांशी संपर्क केला नसल्याचे अथवा कोणतीही माहिती दिली नसल्याचे समोर आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!