पुण्यातील भोंदूबाबाचा धक्कादायक कारनामा! अत्याचार करत विजेचे शॉक, मूत्रही पाजलं, मग…; उच्चशिक्षित महिलेसोबत १७ वर्षे काय केलं?


पुणे : खराडी परिसरात उघडकीस आलेल्या भोंदूबाबा प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. स्वतःला ईश्वराचा अवतार असल्याचा दावा करणाऱ्या एका भोंदूबाबाने उच्चशिक्षित महिलेचा तब्बल १७ वर्षे छळ केल्याचा आरोप असून, तपासादरम्यान अत्यंत गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिला एका खासगी कंपनीत कार्यरत असून तिचे कुटुंब अनेक वर्षांपासून या तथाकथित आध्यात्मिक गुरूच्या संपर्कात होते. याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने कुटुंबाचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर महिलेवर मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

तपासात असेही समोर आले आहे की, आरोपीने महिलेला तिच्या वैयक्तिक आयुष्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तसेच तिच्या मालमत्तेवर नियंत्रण मिळवल्याचाही आरोप आहे. अनेक वर्षे सुरू असलेल्या या कथित छळामुळे महिला मानसिकदृष्ट्या खचली होती.

अखेर महिलेने धैर्य दाखवत कुटुंबीयांसमोर घडलेला प्रकार मांडला. त्यानंतर पुराव्यांच्या आधारे खराडी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीसह अन्य संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात लैंगिक अत्याचार, गुन्हेगारी कट तसेच अंधश्रद्धा आणि अघोरी प्रथांशी संबंधित कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!