धक्कादायक!! पोलिसांसमोर काँग्रेस खासदाराला पळवून पळवून मारलं, डोकं फोडलं अन्…

राजकारणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बिहारमधील काँग्रेस खासदारावर जमावाने प्राणघातक हल्ला केला आहे. बिहारमधील सासारामचे खासदार मनोज राम यांना कैमूरच्या मोहनिया येथे हल्ला करण्यात आला.
या घटनेने मोठी खळबळ उडाली असून याबाबत पोलीस तपास करत आहेत. याबाबत माहिती अशी की, ही घटना त्यांच्याच भावाच्या सेंट जॉन इंटरनॅशनल शाळेजवळ घडली आहे. येथील PACS निवडणुकीनंतर निघालेल्या मिरवणुकीतील लोक आणि स्कूल बसचा चालक यांच्यात हाणामारी झाली होती.
यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदाराला जमावाने घेरले आणि त्यांना मारहाण करुन जखमी केले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. यानंतर त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आणि शाळकरी मुलांना सुखरूप घरी सोडण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये स्कूल बस चालक आणि मिरवणुकीत सहभागी असलेल्या काही लोकांमध्ये बाचाबाची झाली. नंतर वाद वाढला. यातून हाणामारी झाली.
दरम्यान, त्या हाणामारीत खासदार मनोज कुमार यांनी मध्यस्थी केली. त्यांनी लोकांना समजवले आणि वातावरण शांत केले त्यानंतर मिरवणूक पुन्हा रवाना झाली. मात्र नंतर वाद सुरू झाला. यावेळी हे त्यांच्या अंगलट आली. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.