पुणे- सोलापूर महामार्गावर अपघाताचा थरार ; डिव्हायडर ओलांडून टेम्पो दुसऱ्या वाहनावर आदळला, एकाचा जागीच मृत्यू…

पुणे: पुणे – सोलापूर महामार्गावर वाखारी गावाजवळ दोन टेम्पोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही मोठ्या वाहनांच नुकसान झाले आहे. टेम्पो डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडकला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील वाखारी गावच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला. पुण्यावरून सोलापूरच्या दिशेला जात असलेल्या टेम्पोने विरूद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली.चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि टेम्पो डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या रोडवरील टेम्पोवर जाऊन धडकला. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा अपघात वाकडा पुलाजवळ अपघात असून अधिक तपास पाटस पोलिस करत आहेत.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर देखील भीषण अपघाताची घटना घडली. वाशिममधील समृद्धी महामार्गावर ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
