धक्कादायक! अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये पाळना तुटला, एकाच मृत्यू, दोघे गंभीर जखमी…


सोलापूर : जिल्ह्याच्या अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमधील फिरत्या पाळण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पार्कमध्ये वेगात पाळणा फिरत असताना एक पाळणा निसटून पडल्याने पाळण्यातील तिघेजण जखमी झाल्याची माहिती आहे.

याबाबत तपास सुरू आहे. घटनेत भिगवण येथील तुषार धुमाळ अत्यंत गंभीर जखमी झाले होते. धुमाळ यांना तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. भिगवण येथील नावाजलेले व्यावसायिक म्हणून ते प्रसिद्ध होते.

घटनेचा व्हिडीओ आला समोर..

या अपघातातील इतर दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ही घटना नेमकं कशी घडली याबाबत तपास सुरू असून सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी पर्यटक नेहेमी गर्दी करत असतात. जयसिंह मोहिते पाटील यांचे हे वॉटर पार्क आहे.

दुर्दैवाने आज येथील पाळण्याच्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघा जखमींवर उपचार सुरू आहेत. यामध्ये एकाच्या मानेला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. तसेच तिसरा व्यक्ती किरकोळ जखमी आहे. घटनेनंतर इतर पर्यटक घाबरले होते.

दरम्यान, अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्क हे सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध वॉटर पार्क आहे. याठिकाणी अनेक वेगवेगळ्या गेम्स असून अनेक राइड आहेत. दरम्यान, सध्या अशा प्रकारच्या अनेक दुर्घटना घडत असून याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!