धक्कादायक! पुण्यातील’ त्या ‘आयटी पार्कमध्ये कार्यरत असलेल्या 400 फ्रेश कर्मचाऱ्यांना नारळ…


पुणे : पुण्यातील हिंजवडी हे भारतातील सर्वात मोठे आयटी हब म्हणून ओळखले जाते.या हिजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये कार्यरत असलेल्या एका आयटी (IT) सल्लागार कंपनीने तब्बल 400 नवीन उमेदवारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे हे सर्व उमेदवार आता आर्थिक संकटात सापडले आहेत.

संबंधित आयटी सल्लागार कंपनीने’ पेड ट्रेनिंग’ आणि’ हमीची नोकरी’ देण्याच आमिष दाखवून उमेदवाराकडून प्रत्येकी एक ते तीन लाख रुपये पर्यंतची रक्कम उकळली.प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील दोन महिन्यांसाठी दरमहा 15000 रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिलं. याशिवाय, त्यानंतर प्रोजेक्ट देऊन वार्षिक 3 ते 4 लाख रुपये पगार दिला जाईल, असंही सांगितलं गेलं होतं. कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचं प्रशिक्षण आणि दोन महिन्याचं मानधन देण्यात आलंय परंतू पुढील चार महिने पगारच दिला गेला नाही. त्यामुळे कर्मचारी रस्त्यावर आले. विशेष म्हणजे कंपनीचे हेड ऑफिस सतत बंद असतं, अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केली. कर्मचाऱ्यांनी फोरम फॉर इम्पलॉय या संघटनेकडून आवाज उठवला असताना ही घटना फसवणूक असल्याच समोर आलं आहे. त्यामुळे कंपनीत काम करताना पेड प्लेसमेंटच्या जाळ्यात अडकू नका, असा सल्ला दिला जात आहे.

दरम्यान फोरमने या प्रकरणी हा केवळ कामगार वाद नसून गंभीर फौजदारी गुन्हा असल्याचे सांगत कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!