पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीपूर्वी ठाकरेंना धक्का: अजितदादांचे पुत्र ‘या ‘बड्या नेत्याच्या भेटीला


पुणे : आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सध्या सर्वच पक्षात फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. त्यातच आता पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची भेट घेतली आहे.या भेटीमुळे वाघेरे यांच्या पक्षांतरची चर्चा जोर धरली आहे.

पिंपरी-चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. या भागावर पुन्हा एकदा मजबूत पकड मिळवण्यासाठी अजित पवार यांनी रणनीती आखली जात असल्याचे बोललं जात आहे.या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पिंपरी-चिंचवडमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे..अशातच आता ठाकरे गटाचे शहराध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकीचे उमेदवार संजोग वाघेरे हे पुन्हा स्वगृही परतणार असल्याचे बोललं जात आहे. संजोग वाघेरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात परतणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पार्थ पवार यांनी थेट वाघेरे यांच्या घरी जाऊन भोजन केल्याने हा त्यांना पुन्हा आपल्या पक्षात परत आणण्याचा एक प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. अजित पवार यांच्या गटाला पिंपरी-चिंचवडमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी वाघेरे यांच्यासारख्या अनुभवी आणि लोकप्रिय नेत्याची गरज आहे. त्यामुळे जर संजोग वाघेरे पुन्हा अजित पवार गटात गेले, तर ठाकरे गटाचे शहरात मोठे नुकसान होऊ शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!