जेजुरीत राष्ट्रवादीला धक्का! सात माजी नगरसेवक भाजपात, आगामी निवडणुकीत समीकरण बदलणार…


जेजुरी : जेजुरीत नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सात माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे आगामी काळात अनेक गणित बदलणार आहेत. याबाबत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारीच भाजपने सुरू केली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुणे येथील कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी अनेक कार्यक्रम उपस्थित होते. अनेक दिवसांपासून याबाबत कुजबुज सुरू होती.

यामध्ये आता माजी उपनगराध्यक्ष गणेश आगलावे, माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ पेशवे, माजी उपनगराध्यक्ष सुधीर गोडसे, माजी नगरसेवक दिलीप मोरे, महेश आगलावे, सतीश घाडगे, राजेंद्र कुंभार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संजय खोमणे, योगेश आगलावे, बाळासाहेब बारभाई, धनंजय गोडसे यांनी हा प्रवेश केला आहे.

सध्या पुरंदरमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. माजी आमदार संजय जगताप देखील भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष शेखर वडणे, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष साकेत जगताप, पुणे जिल्हा भटक्या विमुक्त जाती जमाती अध्यक्ष रवींद्र खोमणे, जेजुरी शहर भाजपाचे अध्यक्ष सचिन पेशवे आदि उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!