राष्ट्रवादीला धक्का! अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कार्यालयात क्राइम ब्रांचची धाड, काय आहे प्रकरण?

पुणे : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी (13 जानेवारी )थंडावल्या पण यानंतर पुण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्याशी संबंधित ‘डिझाईन बॉक्स’ संस्थेच्या पुणे कार्यालयात गुन्हे शाखेचं पथक दाखल झालं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

समोर आलेल्या माहितीनुसार,’डिझाइन बॉक्स’ यांच्या पुणे कार्यालयात मंगळवारी गुन्हे शाखेचे काही अधिकारी माहिती घेण्याच्या उद्देशाने उपस्थित झाले होते. पोलिसांनी यावेळी काही कागदपत्रे देखील तपासली यानंतर काही वेळाने पथक निघून गेलं. मात्र पुणे पोलीस अजित पवारांच्या राजकीय सलाग्गारांच्या कार्यालयात घुसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रियां देताना असं म्हटलं की,संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक ती माहिती देण्यात आली असून, संपूर्ण सहकार्य करण्यात आलं. या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पुणे पोलीस आणि नरेश अरोरा यांनीही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. पोलिसांना आमच्या संस्थेने सहकार्य केलं असून त्यामधून नेमकं काय प्रकरण आल आहे ते समोर आलेले नाही. सहकार्य त्यांना हव असेल तर आम्ही सहकार्य करूच असे त्यांनी म्हटले आहे.
पुणे पोलिसांनी असं म्हटलं की, पुणे आयुक्तालयाच्या हद्दीतील एका ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक तातडीने तपासासाठी दाखल झाले. मात्र तिथे काही अनुचित आढळले नाही