मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, मंत्रीपद, आमदारकीही जाणार?

नाशिक : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी की, 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. याबाबत सुनावणी सुरू होती. आता नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
या निर्णयाला जर याला वरच्या कोर्टाने स्थगिती दिली नाही, तर मात्र त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात सारकवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोकाटे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत.
1995 ते 97 काळात सरकारच्या 10 टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून याबाबत सुनावणी सुरू झाली होती. अखेर आज निकाल आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्हा न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात एकूण चार जणांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला होता. मात्र कोर्टाने उर्वरित दोघांना कोणतेही शिक्षा सुनावलेली नाही. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.