शिवसेना एकनाथ शिंदेची ! धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला …!

नवी दिल्ली : शिवसेना नाव व धनुष्यबाण एकनाथ शिंदेंच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेतील सभापती आणि काही सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रकरणातील युक्तिवादाचा मुख्य आधार असलेल्या नेबाम रेबियाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात बदल किंवा सुधारणा यावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली.
नबाम रेबिया प्रकरणात आधीच्या घटनापीठाचा निर्णय आणि तो मोठ्या घटनापीठाकडे पाठवण्याची गरज यावर विचार करण्यास न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. तसेच, आता सर्वोच्च न्यायालय 21 फेब्रुवारीपासून गुणवत्तेच्या आधारावर उद्धव विरुद्ध एकनाथ गटाच्या मुख्य मुद्द्यावर सुनावणी सुरू करणार आहे.
गुरुवारीच घटनापीठाने उद्धव गट विरुद्ध शिंदे गट यांच्यातील अपात्रतेच्या प्रकरणी नबाम रेबियाच्या निर्णयावर फेरविचार करण्याच्या मुद्द्यावर सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुनावणी पूर्ण करून निर्णय सुरक्षित केला.
पहिल्या सुनावणीदरम्यान, उद्धव गटाने नबाम रेबिया निकालाच्या काही पैलूंवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि नबाम रेबिया निकालाचे काही पैलू 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवावेत असे सांगितले होते. तर नबाम रेबियाच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज नसल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे.