Shirur : शिरूरमध्ये अचानक घरातून निघून जात आहेत मानसं, महिन्याभरात ५ जण बेपत्ता, नेमकं घडतंय काय?


Shirur : शिरुरमध्ये अवघ्या महिन्याभरात पाच लोक अचानक बेपत्ता झाले आहेत. या प्रकारानंतर शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कुणाला काहीही न सांगता घरातून निघून जाण्याचं हे प्रमाण वाढले आहे.

यात महिला, पुरुष आणि तरुणांचा समावेश आहे. अल्पवयीन मुलींचाही त्यात समावेश आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अचानक हे लोक गायब होत असल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. तर तालुक्यात या घटनेमुळे चर्चांना उधाण आलं आहे. Shirur

जुने शिरुर (रामलिंगम) या भागातून सुमन सखाराम साळवे ही ४४ वर्षाची महिला तिचा मुलगा जीवन सखाराम साळवे वय १८ याच्यासोबत गायब झाली आहे. रविवारी सकाळी सुमन आणि तिचा मुलगा जीवन सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडले. पण रात्री उशीर जाला तरी दोघेही घरी आले नाही. सुमन हिने पती सखाराम साळवे यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवला होता.

शााळेतील शिक्षक व कर्मचारी त्रास देत असल्याने आम्ही निघून जात आहोत, असं या मेसेजमध्ये म्हटल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी सखाराम यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस नाईक एन.बी. शिंदे या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे.

शिरूर शहरातील सोनार आळीतून प्रतिक्षा वैभव शहा ही २० वर्षाची तरुणी बेपत्ता झाली आहे. ही मुलगी २३ जुलैपासून बेपत्ता आहे. तिचा अजूनही शोध लागलेला नाही. पोलीस कसून तपास करत आहेत.

भाजी मार्केटमधून गायब..

मनिषा राजेंद्र शुक्ला ही ३५ वर्षाची महिला शिक्रापूर येथून गायब झाली आहे. भाजी मार्केटमध्ये गेलेली मनिषा परत आलीच नाही. कुणाला काहीही न सांगता ती निघून गेली. कुटुंबीयांनी नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्र मैत्रिणी सर्वांना विचारून पाहिले, पण कुणाकडेही मनिषा दिसली नाही. या महिलेच्या कानात सोन्याची रिंग आहे, गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र आहे, पायात पैंजण आणि जोडवे आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे.

इन्स्टाग्रामवर ओळख अन्…

शिरूरच्या बागवान नगरमधील एक अल्पवयीन मुलगीही बेपत्ता झाली आहे. इन्स्टाग्रामवर एका अनोळखी व्यक्तीबरोबर ओळख झाली. त्याच्यासोबत ही मुलगी चॅटिंग करायची. त्यामुळे आई रागवल्याने ती घर सोडून गेल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!