Shirur : शिरुर-हवेलीत विधानसभेत हवेली तालुक्याचे मतदारसंख्या ३६ हजारांनी वाढली! तिरंगी लढतीच्या शक्यतेने निकालाची गणिते बदलणार..
जयदीप जाधव
Shirur उरुळीकांचन : शिरुर-हवेली विधानसभा आगामी निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली असून शिरुर-हवेली विधानसभेसाठी हवेली तालुक्याची मतदारसंख्या शिरुर तालुक्यापेक्षा ३६ हजार मतदारांनी वाढली असून एकूण ४ लाख ५५हजार ५४०मतदारांपैकी शहरी भागातील मतदार वाढल्याने हवेली तालुक्यातील निर्णायक मतदानावर विधानसभेच्या पुढील घडामोडी अवलंबून असणार आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून १९८ शिरुर विधानसभा मतदारसंघाचीअंतिम मतदारयादी राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम करण्यासाठी पाठविली आहे.या अंतिम मतदार यादीत एकूण ४ लाख ५५ हजार ५४० एकूण मतदारसंख्या झाली आहे. तर त्यापैकी शिरुर तालुक्यात २ लाख ९ हजार ७९३ मतदार तर हवेली तालुक्यात २ लाख ४५ हजार ५४०मतदार इतकी नोंद झाली आहे.
त्यामुळे शिरुर-हवेली मतदारसंघातहवेली तालुक्याची मतदारसंख्या शिरुरपेक्षा ३६ हजार मतदार इतकी वाढली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हवेलीची मतदारसंख्या निर्णायक भूमिका बजावणार आहे. शिरुर-हवेली विधानसभेची हि शेवटची निवडणूक ठरणार आहे.या निवडणुकीनंतर राज्य निवडणूक आयोग राज्यात सर्व विधानसभा व लोकसभा मतदारसंघाचे पुर्नरचना करणार असल्याने ‘शिरुर-हवेली’त यंदाची निवडणूक रंगतदार होण्याचीचिन्हे आहेत. Shirur
यंदाच्या निवडणुकीची विशेषतः हा म्हणजे हवेली तालुक्यात यंदा महायुतीकडून प्रबळ दावेदार म्हणून भाजपकडून प्रदीप कंद तर महाविकास आघाडीचे उबाठाकडून ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके उमेदवार शड्डू ठोकून आहेत. त्यापैकी भाजपने प्रदीप कंद यांना हिरवा कंदील दिला आहे. तर माऊली कटके उबाठा अथवा स्वतंत्ररीत्या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. त्यांनी मतदारसंघात मोठी वातावरण निर्मिती केली आहे. तर या दोघांना शिरुर सलग चौथ्यांदा निवडणूक लढविणारे व शरद पवार गटात जिल्ह्यात एकमेव राहिलेले आमदार अशोक पवार यांचे तगडे आव्हान असणार आहे.
पण शिरुर- हवेली मतदारसंघात मागील तीन विधानसभा निवडणुकीचे निकालाचे चित्र पाहता जनता या ठिकाणी दरनिवडणुकीला ‘भाकरी फिरवते’ असा निकाल जनतेने दिला आहे.त्यामुळे यावेळी या मतदारसंघात राष्ट्रवादीची दुफळी व मतदारसंघातील दोन्ही सहकारी साखर कारखाने बंद फटका नाराजीतून दिसण्याचा शक्यतांनी हवेलीतून प्रदीप कंद वमाऊली कटके यांचे निवडणूक लढविण्याचे मनोबल वाढले आहे. हे मनोबल आ.अशोक पवार यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराला कसे रोखतयं हे सर्व पाहणे औक्सुक्याचे ठरत आहे.
आशातच महाविकास आघाडी व महायुतीत प्रथम वाटणारी दुरंगी लढत तिरंगी होणार असल्याने ही निवडणूक अधिक रंजक होऊ लागली आहे. माऊली कटके यांनी वाघोली गावातील एकूण व जनसंपर्कावर तयारी चालवलेली असली तरी महाविकास आघाडीच्या मतांत मोठी उभी फूट पडणार असल्याने शिरुर- हवेलीत सध्या विधानसभेची निवडणूक काट्याची होण्याची शक्यता आहे. यंदा हवेलीची ३६ हजार इतकी मतदारसंख्या वाढल्याने निवडणूकीच्या सर्व शक्यतांची भाकीते वर्तविण्यास सुरुवात झाली आहे.