Shirur : मोठी बातमी! शिरुर-हवेली मतदारसंघाची जागा भाजपकडे जाणार! राज्यात १६० जागा व उमेदवारांची यादी दिल्ली हायकमांकडे पाठविली..

जयदीप जाधव
Shirur उरुळीकांचन : भाजपकडून राज्यपाल नामनिर्देशित नावे जाहीर झाल्यानंतर राज्यातील विधानसभेसाठी १६० जागावाटपाची यादी दिल्ली हायकमांडला राज्य कोअर कमिटीने पाठवली असून या संभाव्य जागावाटपाच्या यादीतबहुचर्चित शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघाचा सामावेश असून भाजपचे राज्याचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपात ही जागा पक्षाकडे ठेवण्यावर मोहोर उठविल्याने शिरूर-हवेली मतदारसंघ जागावाटपाचा तिढा आता संपला असून शिरूर-हवेलीची जागा भाजपच्या वाटेला जाणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
भाजपकडून राज्यात विधानसभेसाठी १५० जागांवर पक्ष निरीक्षण नेमल्यानंतरया जागांवर भाजपकडून संभाव्य इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. महायुतीत ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने ही जागा राष्ट्रवादीला सोडली जावी म्हणून राष्ट्रवादीचे नेते आग्रही होते. मात्र मतदारसंघातील भाजपची संभाव्य ताकद व मतदारसंघातील पक्षाअंतर्गत सर्व्हेत या जागेवर भाजपासाठी अनू कुल सर्व्हे अल्यानंतर भाजपकडून देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही जागा आपल्या संभाव्य १६०जागावाटप यादीत हायकमांडकडे पाठविल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीकडून या संभाव्य जागेसाठी लढत देईल असा उमेदवार नसल्याने भाजप कोअर कमिटीने बार्गेनिंगपावर (ताकदीच्या ) बळावर जागेवर हक्क सांगून हायकमांडकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या जागेची जबाबदारी काही मंडळींवर सोपवली आहे. दिल्लीत राज्यातील जागावाटप व उमेदवारांच्या यादीवर वरिष्ठ हायकमांड नजर टाकणार आहे. त्यानंतर जागावाटप जाहीर होणार आहे. त्यामुळे शिरूर-हवेली मतदारसंघाचा तिढा जवळपास संपुष्टात आला आहे. शिरूर – हवेली मतदारसंघातून भाजपकडून प्रदिप कंद यांनी जोरदार तयारी केली असून प्रदिप कंद यांच्या रुपाने हवेली तालुक्याला विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे.