Shirur : शिरूरमधील संस्था अध्यक्षासह पाच जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होताच झाले फरार, पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष…


Shirur : शिरूर शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेतील संस्था अध्यक्षासह अन्य पाच जणांवर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

कर्मचाऱ्याने सेवा जेष्ठतेनुसार मुख्याध्यापक पद मिळवण्यासाठी संस्थेविरोधात याचिका दाखल केली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्याचा वारंवार मानसिक छळ, आर्थिक लाभापासून वंचित ठेवून, दबाव दमदाटी करून कोऱ्या दस्तऐवजावर बळजबरीने सह्या घेऊन जातीयवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली होती.

या प्रकरणी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था अध्यक्ष नंदकुमार निकम यांच्यासह संस्था सचिव प्रकाश बोरा, शाळा समिती सदस्य अनिल बोरा, परिवेक्षक कुमारपाल बोरा, वरीष्ठ लिपिक सुभाष पाचकर, सुरज जाधव यांच्यावर अँट्रॉसिटी अंतर्गत रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे दाखल होताच हे सर्व आरोपी फरार झाले आहेत.

या शिक्षण संस्थेमध्ये अनेक बोगस बिले तयार करुन घोटाळे, वसुलीचे फंडे सुरु असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. या विषयी एका युवकाने वरीष्ठ कार्यालयाकडे लेखी तक्रार केली आहे. Shirur

संस्थेतील बड्या व्यक्तींचे राजकीय व्यक्तींसोबत घनिष्ठ संबंध असल्याने कारवाई टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. त्यामुळे या बड्या संस्था पदाधिका-यांवर काय कारवाई होणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

नवनियुक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंद्यावर धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे नागरिकांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मात्र, आता राजकीय हस्तक्षेपामुळे शहरातील बड्या शिक्षण संस्था अध्यक्षांसह अन्य पाच जणांवर कठोर कारवाई होणार का? त्यांना अटक कधी करणार? का संस्थेतील बड्या व्यक्तींचे राजकीय व्यक्तींसोबत घनिष्ठ संबंध असल्याने त्यांना अभय मिळणार? अशी चर्चा शिरूर तालुक्यात सुरु आहे. त्यामुळे वरीष्ठ पोलिस अधिकारी राजकीय दबावाला न जुमानता त्यांना गजाआड करणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!