Shirur : शिरूरमध्ये तुतारीच? लढतीत पहिल्या फेरी अखेर अमोल कोल्हे 9 हजार मतांनी आघाडीवर…


Shirur : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात चुरशीची लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये शिरुरचा समावेश आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध अजितदादा गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना रंगला होता.

गेल्या निवडणुकीत अमोल कोल्हे हे आढळराव पाटलांचा पराभव केला होता. यंदाही ते यशाची पुनरावृत्ती करणार असल्याचे चित्र पहिल्याफेरी अखेर दिसत आहे. हे चित्र सकाळी ९ पर्यंतचे आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर अमोल कोल्हे हे पहिल्या फेरी अखेर ९००० पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघाचा अपवाद वगळता पाचही विधानसभा मतदारसंघात कोल्हे यांना आघाडी मिळाली आहे. Shirur

भोसरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपचे आमदार महेश लांडगे आहेत. पहिल्या फेरी अखेर अमोल कोल्हे यांनार ९००० मतांची आघाडी महायुती चे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!