काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपची शिंदेंनी जिरवली, अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणार…


मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये अंबरनाथची चर्चा सुरू आहे. एका दिवसापूर्वी काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला आता शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदेंची शिवसेना आता अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणार आहे. यामुळे येथील राजकारण वेगळ्या वळणावर गेले आहे. यामुळे काँग्रेसच्या फुटीर नगरसेवकांसोबत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठा धक्का दिला.

याठिकाणी शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांना आता अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे संख्याबळ वाढले आहे. एका अपक्षानेही त्यांना पाठिंबा दिला असून एकूण 32 नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला आहे. भाजपचे 16 नगरसेवक निवडून आले होते.

सद्य परिस्थितीत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने आधी काँग्रेससोबत आघाडी केली. मात्र वरिष्ठांकडून त्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपने काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडले. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करत सत्ता स्थापनेचा दावा केला. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.

दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे 27, अजितदादांचे चार आणि एका अपक्षाच्या मदतीने त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. याबाबत पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. यामुळे येथील राजकीय समीकरण बदलले असल्याचे दिसून आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!