पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार शिखर धवन! कोण आहे होणारी बायको? लग्नाची तारीख, ठिकाण जाणून घ्या…


मुंबई : पूर्व भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज आणि ‘गब्बर’ म्हणून ओळखला जाणारा शिखर धवन पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यातील नवा अध्याय सुरू करण्यास सज्ज झाला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर खासगी आयुष्यामुळे चर्चेत असलेला शिखर धवन आता दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

शिखर धवन आणि त्याची गर्लफ्रेंड सोफी शाइन यांच्या लग्नाची तारीख ठरल्याची माहिती समोर येताच चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. . शिखर आणि सोफी आता अखेर लग्न करणार असल्याचे म्हटले जात असून तो दोघे कधी लग्न करणार आहे या संदर्भातील माहिती ही समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिखर धवन आणि सोफी शाइन यांचा विवाह फेब्रुवारी २०२६ च्या तिसऱ्या आठवड्यात दिल्ली-NCR परिसरात पार पडण्याची शक्यता आहे. हा विवाह अचानक घेतलेला निर्णय नसून, तो नियोजनपूर्वक आणि खासगी स्वरूपात आयोजित केला जाणार असल्याचे संकेत आहेत.

तसेच २०२५ मध्ये दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान त्यांना एकत्र पाहिले गेले होते, त्यानंतर लगेचच त्यांनी त्यांच्या नात्याची पुष्टी केली. शिखर धवनचा हा दुसर लग्न आहे, त्याची पहिली पत्नी आयशा मुखर्जी होती.

सोफी शाइन ही मूळची आयर्लंडची असून, गेल्या काही काळापासून ती शिखर धवनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. २०२५ मध्ये दुबई येथे झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका सामन्यादरम्यान शिखर आणि सोफी एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याबाबत चर्चा रंगू लागल्या. दोघेही सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसू लागल्यानंतर त्यांच्या नात्याला अधिकृत स्वरूप मिळाल्याचे मानले जात होते.

सोफी शाइन फारशी प्रसिद्धीच्या झोतात नसली तरी शिखर धवनसोबतच्या नात्यामुळे ती चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरही दोघांचे फोटो आणि उपस्थिती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. आता हे नाते विवाहबंधनात अडकणार असल्याने शिखर धवनच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी मानली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!