Sharmila Pawar : बारामतीत राडा!! मतदारांना घड्याळाच्या स्लीपचं वाटप, कार्यकर्त्यांना धमक्या, युगेंद्र पवारांच्या आईचे गंभीर आरोप…


Sharmila Pawar : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात उत्साहात मतदान सुरू आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी मतदान केंद्रावर दमदाटी केली जात असल्याचा आरोप केला आहे

तसेच बारामतीत मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना घड्याळाचे शिक्के असलेल्या स्लीप वाटत असल्याने शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचंही शर्मिला पवार यांनी सांगितले आहे.

शर्मिला पवार यांनी मतदारांच्या नावाच्या चिठ्ठीवर घड्याळाचा शिक्का मारलेल्या स्लीप दाखवत म्हटलं की, मी इथं आल्यावर मला हे सापडलंय. जे मतदार आले आहेत त्यांना चिठ्ठ्या दिल्या आहेत. त्यावर घड्याळाचा शिक्का मारलाय. हे योग्य आहे का, आम्ही तक्रार करणार आहे. यासंदर्भात तक्रार करणार आहोत. Sharmila Pawar 

कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून धमकी देण्यात आल्याचा आरोपही शर्मिला पवार यांनी केला. त्यांनी म्हटलं की, स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आमच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे. मतदारांकडे चिठ्ठ्या असून त्यावर शिक्के मारून आत सोडलं. इतर ठिकाणी बूथवर फिरत होते. तेव्हा आमच्या कार्यकर्त्याला धमक्या आल्या.मी संपवतो, तुला खल्लास करतो अशी भाषा इथं सुरू आहे.

दरम्यान, बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी थेट लढत होत आहे. आज सकाळीच पवार कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दुपारी शहरातील खाटिक गल्ली इथल्या मतदान केंद्रावर मतदारांना दमदाटी केलं जात असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!